मतदार माजी नगरसेवकांकडून कामाचा हिशोब घेणार आणि आजी नगरसेवकांना संधी देतील का? प्रभाग क्रमांक. ११

Pranesh

Updated on:

पिंपरी–चिंचवड २८ डिसेंबर २०२५ (अधिकार वार्ता प्रतिनिधी): – पिंपरी चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ चा सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत असे म्हणणारे अधिकृत उमेदवार आहेत, कुंदन अंबादास गायकवाड (मा.नगरसेवक प्र.क्र.१), सौ. रिटा सचिन सानप, सौ. योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे(मा.नगरसेविका प्र.क्र.११), निलेश मधुकर नेवाळे. हे भाजपाचे प्रभाग क्रमांक ११ मधून अधिकृत उमेदवारी भरणार असल्याचे समजते. या प्रभाग क्रमांक ११ मध्ये बाजी मारणार कोण यावर पुढचं लक्ष असे दक्ष वातावरण झाले आहे.

विद्यमान मा. नगरसेवक अंबादास गायकवाड व मा. नगरसेविका योगिता नागरगोजे यांचा प्रभागावर चांगलाच दबदबा असल्याचे सांगितले जाते. मागील पाच वर्षांमध्ये अनेक कामे झाले, फलके लावले गेले; पण कुठेतरी काम राखडले असावे म्हणून “पुन्हा निवडून आलो की करू” या प्रश्नांमध्ये अडकून राहिले आहे. पण मतदार या कामाचा हिशोब या निवडणुकीमध्ये घेणार हे मात्र नक्की.इच्छुक उमेदवार जनसेवेच्या नावाखाली सक्रिय झाले आहेत. क्रिकेट टूर्नामेंट, खेळ पैठणीचा, अशी वेगवेगळे कार्यक्रम झाले, कार्यक्रम घेऊन फोटो झाले, मंदिरामध्ये जाऊन देवाचे दर्शनही झाले; पण प्रभागातील पाणी, रस्ते, ड्रेनेजचे दर्शन कधी घडणार? सर्वजण कार्यक्रम घेत आहेत पण प्रभागाचे समस्या का दिसत नाही? असा सवाल स्थानिक विचारू लागले आहेत.

सामाजिक कार्य करत निलेश नेवाळे व रिटा सानप मैदानात उतरले असले तरी, सामाजिक काम व सार्वजन जबाबदारी यातला फरक निवडणुकीनंतरही त्यांच्या लक्षात राहील का? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. माजी नगरसेवक अंबादास गायकवाड आणि योगिता नागरगोजे हे सत्तेत असताना प्रभागाच्या मूलभूत कामापासून ते दूर असल्याचे दिसून येते. कारण प्रभागात समस्या अनेक आहेत. रस्ते, पाणी, वाहतूक, ड्रेनेज, मूलभूत सुविधा व आरोग्यसेवा या समस्येवर पूर्ण काम झाले नाही.

या लढाईमध्ये खर्च जोरदार चालू असला तरी लढायची जिंकणार कोण? यापेक्षा निवडणूक जिंकल्यानंतर खरंच काम करणार कोण? माजी नगरसेवकांच्या खरंच काम केले का? याचा हिशोब ही जनतेकडे आहे. आजी नगरसेवक हे काम करतील का? हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण यावेळी मतदार फक्त झेंडा पाहणार नाही तर कामाचा हिशोब मागणार आहे ते आजी नगरसेवक असो व माजी नगरसेवक.

 

Leave a Comment