आपच्या सर्व उमेदवाराने घेतले एकनिष्ठतेची शपथ.

पिंपरी–चिंचवड(अधिकार वार्ता प्रतिनिधी):
पिंपरी–चिंचवड मध्ये जिथे उमेदवार पक्ष बदलून सत्तेच्या लालचसाठी पक्षाशी धोकाधडी केले, विरोधी बाकावर जाऊन पक्षातील उमेदवारावर आरोप घातले आज तेच उमेदवार या पक्षात प्रवेश केले आहेत. पण पिंपरी चिंचवड शहरात एक पक्ष असा आहे की ज्याचे एकनिष्ठ कार्यकर्ते ना पक्ष बदलले, नाही उमेदवारी माघारी घेतली. तो पक्ष म्हणजे ‘आप आम आदमी पार्टी.’
काल ७ जानेवारी रोजी असे दिसून आले की पिंपरी चिंचवड शहरांमधील आपचे सर्व कार्यकर्ते व उमेदवार यांनी पक्ष सोबत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतल्याचे निदर्शनास आले. ही शपथ पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर संविधानाला साक्षी मानून ही शपथ घेतल्याचे दिसून आलेआम आदमी पार्टीच्या सर्व उमेदवारांनी आज पक्षाशी, मतदारांशी आणि स्वच्छ राजकारणाशी एकनिष्ठ राहण्याची अधिकृत शपथ घेतली. ही शपथविधी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभाग क्रमांक १० मध्ये विकासाच्या जोरावर चर्चा रंगवणारे उमेदवार ब्रह्मानंद जाधव आणि गौतम तायडे यांच्या देखेत पार पडला. या व्यतिरिक्त उपस्थित सर्व उमेदवारांनी कधीही पक्ष न सोडण्याचा, जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्याचा तसेच कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचार, लाचलुचपत व गैरव्यवहारापासून दूर राहण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.

या शपथविधीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीने शहरात स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख राजकारणाचा संदेश पुन्हा एकदा ठामपणे दिला आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक उमेदवार प्रभागातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहील आणि विकास, पारदर्शक प्रशासन व सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लढा देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
अशी ही आपच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी शपथ घेतली आहे. ही शपथ कायमस्वरूपी असच राहील का? या विस्कळे हे बघणे आवश्यक आहे. कारण महापालिकेच्या निवडणुका चालू असताना कित्येक पक्षांनी व उमेदवारांनी माघार घेतली. जे पक्षासोबत एकनिष्ठ व धडाडीने उभे राहिले ते म्हणजे आपचे उमेदवार व कार्यकर्ते. यापुढे पण असेच राहतील अशी अपेक्षा शहराध्यक्ष काळे यांच्याकडून केली जात आहे.