प्रभाग १० मध्ये राजकीय रणकंदन! भाजप आणि ‘आप’मध्ये थेट लढत; जनतेचा प्रस्थापितांविरुद्ध एल्गार!

Pranesh

पिंपरी-चिंचवड (अधिकार वार्ता प्रतिनिधी): आगामी महापालिका निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १० मध्ये आता राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. या प्रभागात प्रस्थापित भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि वेगाने पुढे येणारी आम आदमी पार्टी (आप) यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांतील प्रलंबित प्रश्नांमुळे जनतेमध्ये सत्ताधारी भाजपविरोधात मोठा रोष पाहायला मिळत असून, ब्रह्मानंद जाधव आणि गौतम तायडे यांच्या रूपाने जनतेला ‘आप’मध्ये सक्षम पर्याय दिसत आहे.जनतेचा संताप आणि सत्ताधाऱ्यांविरुद्ध रोषप्रभाग १० मधील खराब रस्ते, पिण्याच्या पाण्याचा विस्कळीत पुरवठा आणि आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे संतापलेले आहेत. “केवळ निवडणुका आल्या की आश्वासने द्यायची आणि नंतर गायब व्हायचे,” अशी भावना येथील मतदारांमध्ये आहे. सत्ताधाऱ्यांच्या याच उदासीनतेमुळे जनतेचा रोष आता शिगेला पोहोचला असून, मतदारांनी प्रस्थापितांना धडा शिकवण्याचा निर्धार केल्याचे चित्र आहे.

‘आप’चे तगडे आव्हान; जाधव-तायडे यांची जोडी मैदानातएकिकडे भाजप आपली सत्ता टिकवण्यासाठी धडपडत असताना, दुसरीकडे आम आदमी पार्टीचे ब्रह्मानंद जाधव आणि गौतम तायडे यांनी प्रभागात जोरदार मुसंडी मारली आहे. ‘आप’च्या कामाची पद्धत आणि दिल्ली-पंजाबमधील विकासकामांमुळे प्रभावित झालेला मोठा वर्ग व आपचे शहराध्यक्ष रविराज काळे या जोडीच्या पाठीशी उभे राहत आहे. स्वच्छ प्रतिमा आणि जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी यामुळे जाधव आणि तायडे सध्या जनतेच्या पसंतीस उतरत आहेत.थेट लढतीची शक्यताराजकीय विश्लेषकांच्या मते, या प्रभागात इतर पक्षांची ताकद क्षीण होताना दिसत असून मुख्य लढत ही भाजप विरुद्ध आप अशीच होणार आहे. भाजपसमोर आपला गड राखण्याचे आव्हान आहे, तर जनतेच्या रोषाचे रूपांतर मतांमध्ये करून परिवर्तन घडवण्यासाठी ब्रह्मानंद जाधव आणि गौतम तायडे यांनी कंबर कसली आहे.

परिवर्तनाचे वारे? प्रभागातील कोपरा सभा आणि पदयात्रांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रभाग १० मध्ये यावेळी ‘झाडू’ चालणार की ‘कमळ’ टिकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, “आता बदलाची वेळ आली आहे,” हा जनतेचा सूर भाजपसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.

Leave a Comment