महापालिकेच्या निवडणुका लवकरचं पण, उमेदवार लावत आहेत अनाधिकृत बॅनर फ्लेक्सस पोस्टर्स…

Admin

8078 scaled

भोसरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर होणार असल्याने अनधिकृत फ्लेक्स चे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता त्यामुळे भोसरी शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे दिसत आहे. भोसरीतील विविध चौकांमध्ये अनधिकृत बॅनर फ्लेक्स पोस्टर लावले गेले आहेत. यामुळे भोसरी परिसराचे विद्रूपीकरण होत असल्याचे दिसत आहे. दुकानदार व्यापारी यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे म्हटले जात आहे. कारण दुकानासमोर मोठ मोठे फ्लेक्स असल्याने ग्राहकाचे लक्ष दुकानाकडे न जाता फ्लेक्स कडे जाते. यामुळे नुकसानाला सामोरे जात असल्याचे दुकानदार म्हणत आहेत. तरीही महापालिकेकडून काहीच कारवाई केली जात नसल्याचे म्हटले आहे. नागरिक व व्यवसाय करणाऱ्यांना अनधिकृत फ्लेक्स वर कारवाई होत नसल्यामुळे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

8078 1 scaled

राजकीय – नेत्या पुढार्‍यांचे वाढदिवस, सणांच्या शुभेच्छा, व्यवसायाच्या जाहिराती अशा विविध कारणांसाठी भोसरी परिसरामध्ये यामध्ये संविधान चौक, चांदणी चौक, पीएमटी चौक, पुणे – नाशिक रोडचा सेवा रस्ता, लांडेवाडी चौक, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह परिसर, भोसरी – आळंदी रोड, दिघी – भोसरी रोड, दिघी – आळंदी रोड आधी भागांत अनधिकृत फ्लेक्स असल्याने भोसरी परिसराचे विद्रोपीकरण झाले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उभारलेले दिवे यावरही अनधिकृत फ्लेक्स आहेत. राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली महानगरपालिकेने लावलेले सूचनाफलक वाहतूक नियंत्रणाचे खांब यावरही फ्लेक्स लावले गेले आहेत. फ्लेक्स लावण्यासाठी उभारलेले सांगाडे एकाच जागी कित्येक महिन्यापासून पडून आहेत तरीही ’इ’क्षेत्रीय अधिकारी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. यामुळे भोसरी परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. व आता निवडणूक जवळ आल्याने अधिक प्रमाणात फ्लेक्स लावून भोसरी परिसराचे विद्रूपीकरण थांबावे व ’इ’ क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून कारवाईला सुरुवात व्हावी अशी आशा नागरिकांची आहे.

Leave a Comment