
नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला प्रशासन परवानगी देणार नाही; पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य अभियंता संजय कुलकर्णी.
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नाव घेतले जाते. पण शहराच्या वाढत्या विकासात नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम पडल्याचे दिसून येते. आज शहरांमध्ये मोठमोठे एमआयडीसी, आयटी कंपन्या, व त्याचप्रमाणे मोठमोठे कंट्रक्शन सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक मोठा खुलासा केल्याचे समजून आले आहे. आज पिंपरी चिंचवड शहर चारी बाजूने झपाट्याने वाढत आहे मोठमोठ्या गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत. पण, अशा बांधकामासाठी शहराच्या विविध भागात आरएमसी प्रकल्पांची संख्या देखील वाढत आहे. वायु प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने आरएमसी प्रकल्पांसाठी नवे आणि कठोर नियम लागू केले आहेत. पण मात्र, प्रकल्प चालक या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. प्रदूषण मंडळाने वायु प्रदूषणासाठी कारणीभूत असलेले व नियमांचे उल्लंघन करणारे 30 प्रकल्पांच्या नावाच्या यादी पर्यावरण विभागाकडे दिले आहे. या समस्येचे तात्काळ निरसन करण्यासाठी महापालिकेने दोन उपद्रव्य शोध पथकाची नेमणूक केली आहे. या पथकांनी पुनावळे, ताथवडे, पिंपळे निलख आणि मोशी या परिसरातील आर एम सी प्रकल्पाची पाहणी केली.

या पाहणी दरम्यान नऊ आरसीएम प्रकल्प ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक असलेली स्प्रिंकलिंग सिस्टम नसणे, मिक्सिंग ऑपरेशन खुल्या जागेत, खडी, वाळू वक्र सॅण्ड वाहतुकी दरम्यान ताडपत्रीचा वापर न करणे अशा बाबी दिसून आल्या. या प्रकल्पामुळे हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पर्यावरण विभागामार्फत तात्काळ कारवाई करत प्रकल्प लाखबंद (बंद) करण्यात आला. यापुढे आणखीन काही ठिकाणी पाहणी करण्यासाठी पथक जाणार असल्याचे समजले. व जिथे नियमाचे उल्लंघन केलेले दिसेल त्या ठिकाणी तो प्रकल्प लाखबंद (बंद) करण्यात येईल असे सांगितले.