आम्ही सत्तेसाठी नव्हे तर प्रभागाच्या विकासासाठी आणि आम्ही लढू जनतेच्या हक्कासाठी… – ब्रह्मानंद जाधव.

Pranesh

Updated on:

37461

(अधिकार वार्ता प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड: समाजामध्ये कित्येक वर्षापासून काम करत असणारे ब्रह्मानंद जाधव यांनी प्रभागाची अवस्था पाहता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता पाऊल टाकले आहेत. प्रभागांमध्ये नागरिकांच्या सुखा व दुःखामध्ये सहभागी असणारे ब्रह्मानंद जाधव यांनी प्रभागाच्या दुरावस्थेवर मात करण्याचा निर्धार करून प्रभाग क्रमांक १० मधून आम आदमी पार्टी कडून सर्वसाधारण ’ड’ आणि त्यांच्याच बरोबर गौतम तायडे सर्वसाधारण ’क’ यामधून निवडणुकीच्या रिंगणात पाऊल टाकले आहे.

त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेता पिंपरी चिंचवड मध्ये दीड लाख घरे बांधून देऊ असा प्रस्ताव करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपुऱ्या आश्वासनावर पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आंदोलने करून जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवला. भ्रष्टाचाराच्या विरोधात निर्भीडपणे आवाज उठवणाऱ्या जाधव यांनी समाजामध्ये अशी अनेक कामे केली आहे. ज्या कामाचा जोरावर आम आदमी पार्टी कडून त्यांना कार्यकारी अध्यक्ष पद भेटले.

मुख्य प्रश्न हा आहे की ब्रह्मानंद जाधव हे माजी नगरसेवकांसारखे आश्वासनच करतील का या समाजामध्ये क्रांती घडवून आणतील? प्रभागाचा खरंच विकास करतील का? या प्रभागाला अंधारात ठेवून स्वतः प्रकाशित होतील? आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ.

Leave a Comment