पिंपरी चिंचवड मधील भाजपा आमदारावर अजित पवारांचे लाजवतील असे आरोप.

पिंपरी–चिंचवड (अधिकार वार्ता प्रतिनिधी): काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये भाजपावर गंभीर आरोप केल्याचे दिसून आले. २०१७ ते आतापर्यंत महापालिकेची काय दुर्दशा झाली आहे? आणि १९९२ ते २०१७ पर्यंत पालिका कशी होती? हे देखील पत्रकारांसमोर मांडले आहे.
मित्रपक्ष म्हणून राज्यात एकत्र महायुती आहे. पण पिंपरी–चिंचवड व पुणे महानगरपालिकीत दोन्ही मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहे. पवार साहेबांनी पिंपरी–चिंचवडच्या कमला कशी गती दिली म्हणत पवार साहेबांच कौतुक अजित पवारांनी केलं. तसेच गंभीर आरोप भाजापा वर केले, अर्बनस्ट्रीटच्या नावाखाली रस्त्याची सगळी वाट लावली, अनेक रस्त्यावर अतिक्रमण झालं आहे, तिथे हप्तेखोरी देखील करत असल्याचे आरोप अजित पवारांनी केलं आहे. टेंडर मध्ये रिंग केली जाते, दादागिरी केली जाते या नऊ वर्षात असा विकास झाला. मी पुरावे देऊन बोलतो, पुराव्या शिवाय मी बोलणार नाही, बिनबुडाच मी आरोप कोणावर करत नाही. असे म्हणत भाजपवर जोरदार हल्ला बोलला आहे.
प्रत्येकाला लाजवेल असा आरोप
प्रत्येकाला लाजवणारा आरोप देखील भाजपावर केला आहे, अहो भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी मध्ये यांनी पैसा खाल्ला, कुत्र्यांच्या नसबंदी मध्ये. यांनी कुत्र्यांच्या नसबंदी साठी कोट्यवधी पैसा खर्च केला, तरी लोकांना कुत्रे चावत आहेत, २०१७ ला नसबंदी केली तर त्यांची पिल्ल कशी काय झाली? यात पण पैसा खायचा का? अशी जोरदार टीका अजित पवारांनी केली. १९९२ सालापासून २०१७ पर्यंत महारपालिका माझ्याकडे होती. तेव्हा या पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट मी केला. भरपूर कामे झाले हवा तो विकास मी केला पण, २०१७ नंतर मात्र या सत्ताधाऱ्यांनी अशीया खंडात सर्वात श्रीमंत असलेली माझी महानगरपालिका आज कर्जात बुडवली आहे, पिंपरी चिंचवड शहराचे वाटोळे केले आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावरही टीका केली. “विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या मुलावर हाफ मर्डर चे गुन्हे आहेत असा आरोप काँग्रेसने केला होता. या वर ही अजित पवारांनी भूमिका मांडली, गुन्हे दाखल आहेत पण तो गुन्हात दोषी ठरलाय का? आता माझ्यावर ७० हजार कोटीचा आरोप माझावर केलाय. ज्यांनी आरोप केला आहे यांच्या मी बसतोय ना ? मग आरोप म्हणजे दोषी नाही. असे स्पष्टीकर अजित पवारांनी दिले.
या आरोपांवर भाजपाचे स्थानिक आमदार व शहराध्यक्ष यांच्याशी चर्चा.
या आरोपानंतर आमदार महेश लांडगे यांना फोन केला मात्र नेहमी प्रमाणे तो टाळला गेला. आमदार शंकर जगताप यांनी मी प्रचार आहे असे म्हणत बोलणे टाळले. शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना कॉल केला केला तेव्हा त्यांनी बोलणे टाळत उद्या प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रचाराचा नारळ फोडायला येतील. त्या वेळी अजित पवारांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देतील. असे स्पष्टीकर दिले. अजित पवारांचे आरोप सत्य आहेत का ? या मुळे स्थानिक आमदार, शहर अध्यक्ष बोलणे टाळत आहेत का ? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.