२०१७ ते २०२५ पर्यंतच्या भ्रष्टाचारचा जाब मागतोय पिंपरी चिंचवडचा नागरिक! सत्ताधाऱ्यांवर आपच्या प्रश्नांचा ओढा!

Pranesh

पिंपरी–चिंचवड (अधिकार वार्ता प्रतिनिधी): पिंपरी–चिंचवड शहरामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नेत्यांकडून चालूच आहे. पण आता नागरिकही प्रश्न विचारत असल्याचे दिसत आहे.

मी या पिंपरी चिंचवड शहराचा सामान्य नागरिक आहे, आणि या शहरावर माझं प्रचंड प्रेम आहे. म्हणून 2017 पासून 2025 पर्यंतच्या कारभार्यांना माझे काही प्रश्न आहेत. त्यांनी प्रामाणिक पने उत्तरे द्यावीत 🙏पिंपरी चिंचवड शहरात 2017 पासून 2025 पर्यंत झालेले भ्रष्टाचाराची प्रकरणे ज्याची उत्तरे सत्ताधारी कारभार्यांनी अजून दिली नाहीत.

1. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे फिक्स डिपॉजिटच्या ठेव 4 हजार कोटींचा ठेवी मोडल्या.

2.आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका कर्जबाजारी झाली.

3. विकास आराखडा, ( DP Plan ) व ( TP Plan.) , 9 हजार कोटींचा घोटाळा.

4.ग्रीन कोरीडोर 6 हजार कोटींचा घोटाळा.

5. भामा आसखेड जॅक्वेल 300 कोटींचा घोटाळा.

6. टेंडर रिंग प्रक्रियेत घोटाळा स्थापत्य विभागाची 4 हजार कोटींची देणें बाकी.

7. हवेच्या गुणवत्तेसाठी बसवलेले पंपात 1000 कोटींचा घोटाळा,

8. ई लर्निंग मध्ये झालेल 42 कोटींचा घोटाळा, 8. 2017 पासून 2025 पर्यंत लेखापारीक्षण झाले नाही व यात 4500 कोटींचा घोटाळ्याच्या फाईल्स गहाळ आहेत.

9. स्थानिक भूमिपुत्र ( गाववाले) ज्यांच्या जमिनीवर आरक्षने टाकली गेली ( बिल्डरांच्या फायद्यासाठी)

10. कत्तलखान्यांचे आरक्षणे आळंदी येथेच का टाकले गेले?

11. स्थायी समितीच्या अध्यक्ष्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात रंगेहात पकडले आपल्या कार्यकाळात.

12.इंद्रायणी सुधार प्रकल्प अजून कार्यरत नाही.

13.कचऱ्यापासून किती विजनिर्मिती झाली याचा हिशोब नाही?

असा एकूण 40 हजार कोटींपेक्षा जास्तीचा घोटाळा 2017 पासून 2025 पर्यंत झालाया व अश्या असंख्य प्रश्नांना उत्तर देणं हि सत्ताधारी कारभाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे. जे सत्ताधारी कारभारी संविधानिक पदावरील त्यांनी आपल्या कार्यकाळात 2017 ते 2022 + 2025 पर्यंत चा प्रशासकीय कार्यकाळ या काळात झालेल्या कामावर आणि महानगरपालिकेने कर्ज का घेतली?

आणि कुठे खर्च झाला, याची उत्तरे त्यांनी याठिकाणचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कारभारी या नात्याने वरील प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, हि त्यांची नैतिक जबाबदारी आहे, पिंपरी चिंचवड शहरातील एक जबाबदार नागरिक म्हणून मला वाटत कारण हा पैसा जनतेचा पैसा आहे. त्यामुळे आपण सर्व लेखा जोखा जनतेसमोर मांडायला हवा हि माफक अपेक्षा..

आपच्या उमेदवारांनी थेट प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले आहेत. या प्रश्नांवर ते उत्तर काय देतील हे पाहणे महत्वाचे आहे.

Leave a Comment