माजी नगरसेवकाचा पराभव, नव्या पिढीच्या उदयने केला! प्रभाग चार मध्ये झळकला पुन्हा गायकवाड पॅटर्न.

Pranesh

उदय दत्तात्रय गायकवाड यांनी जपला ‘गायकवाडचा वारसा’ प्रभाग क्रमांक ४ मध्ये ठळकपणे दिसला ‘गायकवाड पॅटर्न

60890

दिघी (अधिकार वार्ता प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी नगरसेवक यांना पराभूत करत तरुण पिढीचा उदय, उदय दत्तात्रय गायकवाड यांनी दणदणीत विजय मिळवला असून, या विजयाने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा विजय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, ‘गायकवाडचा वारसा’ जपत उभा राहिलेला ठोस नेतृत्वाचा विजय म्हणून पाहिला जात आहे.

अनुभवी आणि माजी नगरसेवक असलेल्या चंद्रकांत वाळके यांच्याविरोधात निवडणूक लढवताना उदय गायकवाड यांनी आक्रमक आरोप-प्रत्यारोपांपेक्षा थेट जनसंपर्क, विकासकेंद्रित मुद्दे आणि शांत पण प्रभावी रणनीती यावर भर दिला. हाच दृष्टिकोन म्हणजे आज चर्चेत असलेला ‘गायकवाड पॅटर्न’ असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.निवडणूक प्रचारादरम्यान घराघरांत पोहोचणे, नागरिकांच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांची नोंद घेणे, प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि नागरी सुविधांबाबत स्पष्ट भूमिका मांडणे, ही गायकवाड यांची प्रचारशैली मतदारांना भावली. याउलट, माजी नगरसेवक असतानाही अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याची नाराजी मतदारांमध्ये दिसून आली आणि त्याचा थेट फटका चंद्रकांत वाळके यांना बसल्याची चर्चा आहे.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत उदय दत्तात्रय गायकवाड यांनी आघाडी कायम ठेवत विजयाकडे भक्कम पावले टाकली. जसजसा निकाल स्पष्ट होत गेला, तसतसे प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. अखेर निकाल जाहीर होताच फटाक्यांचा कडकडाट, ढोल-ताशांचा निनाद आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विजयानंतर प्रतिक्रिया देताना उदय गायकवाड म्हणाले, “हा विजय माझा वैयक्तिक नसून प्रभागातील जनतेचा आहे.

गायकवाड कुटुंबाने नेहमीच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. हाच गायकवाडचा वारसा मी जपणार असून, विकासासाठी अधिक वेगाने काम करणार आहे.”या निकालामुळे प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपाची ताकद वाढली असून, ‘गायकवाड पॅटर्न’ आता संपूर्ण पिंपरी चिंचवडच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. माजी नगरसेवकाला पराभूत करत मिळवलेला हा विजय आगामी राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा ठरेल, असे संकेत या निकालातून स्पष्टपणे मिळत आहेत.

Leave a Comment