प्रभाग ४ दिघी–बोपखेलमध्ये भाजपची घसरण सुरू? ‘सत्तेचा माज, विकासाचा अभाव आणि नागरिकांचा संताप’—भाजप उतरतीच्या दिशेने!

Pranesh

पिंपरी–चिंचवड (अधिकार वार्ता प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक ४ (दिघी–बोपखेल) मध्ये एकेकाळी दबदबा असलेला भाजप आता गंभीर अडचणीत सापडल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे, सतत तुंबणारे ड्रेनेज, अपुरा पाणीपुरवठा, अस्वच्छता आणि दुर्लक्षित नागरी प्रश्नांमुळे भाजपविरोधात प्रचंड नाराजीचा उद्रेक होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.“घोषणा खूप झाल्या, फलक खूप लागले, पण विकास कुठे आहे?”हा प्रश्न आता फक्त विरोधकच नाही, तर सामान्य नागरिक, व्यापारी, तरुण आणि महिला मतदारही विचारू लागले आहेत.विकासाचे दावे फोल ठरले?

दिघी–बोपखेल परिसरात गेल्या काही वर्षांत मोठमोठ्या विकासकामांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची दुरवस्था, पावसात घरात शिरणारे पाणी, तुंबणारी गटारे आणि अपूर्ण कामे यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर “भाजप म्हणजे फक्त घोषणा, काम शून्य” असे टोमणे खुलेआम दिले जात आहेत.जनतेचा संयम सुटतोयस्थानिक नागरिकांमध्ये आता संताप उफाळून येत आहे.“निवडणूक आली की नेते दिसतात, नंतर पाच वर्षे गायब होतात, ”अशी बोचरी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरही भाजपविरोधात संतप्त पोस्ट, व्हिडीओ आणि टीकात्मक प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.विरोधकांचा थेट हल्लाया संधीचा फायदा घेत विरोधकांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे

“प्रभाग ४ मध्ये भाजपची घसरण सुरू झाली आहे. जनतेने आता या अपयशी कारभाराचा हिशोब मागायला सुरुवात केली आहे,” असे म्हणत‘सत्तेचा माज आणि विकासाचा अपयश’ असा आरोप केला जात आहे.कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थताफक्त जनता नाही, तर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही असंतोष पसरल्याची चर्चा आहे. समन्वयाचा अभाव, दुर्लक्षित कार्यकर्ते आणि जनतेच्या प्रश्नांबाबतची उदासीनता यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढत असल्याचे बोलले जात आहे.

“भाजप पडतीच्या दिशेने?” राजकीय वर्तुळात खळबळया सगळ्या घडामोडी पाहता राजकीय जाणकारांमध्ये एकच प्रश्न चर्चेत आहे—दिघी–बोपखेल प्रभागात भाजप खरंच उतरतीच्या दिशेने जात आहे का? जनतेचा रोष, अपूर्ण विकासकामे, वाढती टीका आणि विरोधकांचा आक्रमक पवित्रा यामुळे आगामी निवडणुकीत भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेवटी प्रश्न जनतेचाच!

आज प्रभाग ४ मध्ये प्रश्न विचारले जात आहेत.विकास कुठे आहे?जबाबदारी कोणाची? आणि या अपयशाची किंमत कोण मोजणार?उत्तर येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीतून मिळेल…आणि ते उत्तर भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

Leave a Comment