विकासाच्या जोरावर सुवर्णा संजय गुंजोटे यांचे पंचायत समितीसाठी रणशिंग!

Pranesh

“होर्टी गावात ज्या पद्धतीने आम्ही पारदर्शक आणि शाश्वत विकास केला, तोच विकास आता संपूर्ण पंचायत समिती क्षेत्रात पोहोचवायचा आहे.

होर्टी (अधिकार वार्ता प्रतिनिधी): एका आदर्श लोकप्रतिनिधीने इच्छाशक्ती दाखवली तर गावाचे नंदनवन होऊ शकते, हे माजी सरपंच संजय गुंजोटे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. त्यांनी होर्टी गावासाठी राबवलेले भूमिगत गटार, पाण्याची चोख व्यवस्था आणि जिल्हा परिषद शाळेचा कायापालट यांसारख्या कामांची आज पंचक्रोशीत चर्चा आहे. याच विकासकामांच्या शिदोरीवर आता त्यांच्या पत्नी सौ. सुवर्णा संजय गुंजोटे या काँग्रेस पक्षाच्या वतीने पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत.

संजय गुंजोटे यांचे उल्लेखनीय कार्य: भूमिगत गटार योजना: गावाला दुर्गंधीमुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी त्यांनी अद्ययावत भूमिगत गटार योजना कार्यान्वित केली.

जलव्यवस्थापन: गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन केले. (पाण्याच्या टाक्या)

शिक्षण क्षेत्राला बळ: जिल्हा परिषद शाळेतील भौतिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चातून अनेक कामे पूर्ण केली, जेणेकरून गावातील मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये.लोकसहभाग आणि स्वखर्च: अनेक सरकारी कामांमधील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून निधी खर्च करून विकासकामांना गती दिली.

निवडणुकीचे समीकरण: संजय गुंजोटे यांच्या कामाचा थेट फायदा आता सौ. सुवर्णा गुंजोटे यांना मिळताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. “केवळ आश्वासने नाही, तर प्रत्यक्ष कृती” हा मंत्र घेऊन त्या मतदारांसमोर जात आहेत.

प्रतिक्रिया: “होर्टी गावात ज्या पद्धतीने आम्ही पारदर्शक आणि शाश्वत विकास केला, तोच विकास आता संपूर्ण पंचायत समिती क्षेत्रात पोहोचवायचा आहे. सामान्य माणसाच्या समस्या सोडवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे”

सौ. सुवर्णा संजय गुंजोटे (उमेदवार, काँग्रेस)या निवडणुकीत होर्टीच्या विकासकामांचा प्रभाव

Leave a Comment