
शहापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): स्वतःच्या चुका उघडपणे मान्य करत “मी चुकीच्या मार्गावर गेलो होतो, पण आता तो मार्ग कायमचा सोडला आहे” अशी स्पष्ट भूमिका मांडणारे शिवसेना शिंदे गटाचे शहापूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार सुनील बनसोडे यांना आता मतदारांनी थेट विजयाचा झेंडा दाखवला आहे, अशी जोरदार चर्चा संपूर्ण गटात सुरू आहे. “माझ्यावर गुन्हे दाखल असले तरी ज्या खाईत मी अडकलो, त्या खाईत माझ्या गावातील एकही युवक जाऊ नये,” असे सांगत बनसोडेंनी केलेली प्रामाणिक कबुली अनेक मतदारांच्या काळजाला भिडली आहे.
त्यांच्या या भूमिकेकडे चूक सुधारून समाजासाठी काहीतरी करण्याची खरी जिद्द म्हणून पाहिले जात आहे.बनसोडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की,“माझी चुकीची पार्श्वभूमी मी मातीत गाडली आहे. सर्व काळी कामं सोडली आहेत. सत्याच्या मार्गाने चालत समाजासमोर एक चांगल्या कर्तृत्वाचा माणूस बनणार आहे. ”या भूमिकेला प्रतिसाद देत शहापूर गटातील मतदारांनी सुनील बनसोडेंना उघडपणे पाठिंबा देत विजयाचा झेंडा दाखवला आहे.
“भूतकाळापेक्षा भविष्य महत्त्वाचं; गुन्हेगारीपेक्षा विकास महत्त्वाचा,” अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे.“जर मी समाजाचा, गावाचा, गणाचा आणि शहापूर गटाचा 100 टक्के विकास केला नाही, तर मतदारांनी माझं जे खैर्यत करायचं आहे ते करा,” असे थेट आव्हान देत बनसोडेंनी आत्मविश्वास दाखवला आहे.
त्यांच्या या निर्धारामुळे विरोधक गप्प झाले असून, शहापूर गटात ‘सुधारलेला माणूस की पारंपरिक राजकारण?’ हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. एकीकडे आरोपांची राजकारणे, तर दुसरीकडे चूक मान्य करून विकासाचं स्वप्न दाखवणारा उमेदवार —यामुळेच आज शहापूर गटात सुनील बनसोडे यांना विजयाचा झेंडा मिळत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.