काक्रंबा गटात ‘दयानंद’ पॅटर्नचा झंझावात! सत्तेच्या दलालांना तरुणाने पाजले पाणी; प्रस्थापितांचे माजलेले ‘बालेकिल्ले’ उद्ध्वस्त…

Pranesh

“विद्यार्थी नेता काय करणार?” असा सवाल करणाऱ्यांच्या तोंडावर आता जनतेने विजयाची चपराक मारली असून, जुन्या दलालांची दुकानदारी कायमची बंद झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

98030 edited

काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): काक्रंबा जिल्हा परिषद गटात दयानंद मोहन शिंदे या तरुण तुफानाने भाजपच्या चिन्हावर ऐतिहासिक विजय मिळवत प्रस्थापितांच्या राजकारणाला सुरुंग लावला आहे. अनेक दशकांपासून सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसलेल्या ‘अनुभवी’ नेत्यांना आणि ‘सत्तेच्या दलालांना’ एका सामान्य विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्याने चारी मुंड्या चीत केले आहे.

अनुभवाचा फुगा फुटला; दलालांची दुकानदारी बंद!निवडणुकीच्या रिंगणात स्वतःला खूप मोठे ‘धुरंधर’ समजणाऱ्या विरोधकांना दयानंद शिंदेंनी धूळ चारली आहे. ज्यांना वाटले होते की राजकारण म्हणजे केवळ पैशांचा खेळ आणि दलाली आहे, त्यांना काक्रंब्याच्या जनतेने मतपेटीतून सडेतोड उत्तर दिले आहे. “विद्यार्थी नेता काय करणार?” असा सवाल करणाऱ्यांच्या तोंडावर आता जनतेने विजयाची चपराक मारली असून, जुन्या दलालांची दुकानदारी कायमची बंद झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

उच्च शिक्षणाचं स्वप्न, प्रस्थापितांना घाम! दयानंद शिंदे यांचा मुख्य भर हा तरुण विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यावर आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर आहे. ज्या नेत्यांनी आजवर तरुणांना फक्त प्रचारापुरते वापरले, त्यांच्यासाठी दयानंद यांचा विजय हा मोठा इशारा आहे. आता काक्रंबा गटात “शिक्षण आणि विकास” हेच केंद्रस्थानी असेल, असे संकेत या विजयाने दिले आहेत.

आता तरी जमिनीवर या! ‘दयानंद शिंदे यांच्या विजयानंतर विरोधकांच्या गोटात स्मशानशांतता पसरली आहे. जनतेने केवळ उमेदवार बदलला नाही, तर भ्रष्ट व्यवस्थेलाच नाकारले आहे. “नेहमी सत्तेच्या मस्तीत राहणारे आता जमिनीवर आले आहेत,” असा टोमणा आता सामान्य नागरिकांकडून मारला जात आहे. ज्यांनी विकासाच्या नावाखाली स्वतःची घरे भरली, त्यांना या तरुण पोराने अस्मान दाखवले आहे.

“हा विजय माझा नाही, तर ज्यांच्या शिक्षणाचा आणि भविष्याचा आजवर सौदा झाला, त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे. सत्तेच्या दलालांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे,” अशी तिखट प्रतिक्रिया नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य दयानंद शिंदे यांनी दिली आहे.

आता या तरुण नेतृत्वाच्या धसक्याने विरोधक उरलेसुरले अस्तित्व टिकवण्यासाठी काय प्रयत्न करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

Leave a Comment