‘तिकीट म्हणजे विजय’ समजणाऱ्या सत्ताधाऱ्यांना गुंजीटेंनी पाजलं पाणी; होर्टीत काँग्रेसचा विजयाचा ‘धुराळा’!

Pranesh

95409

होर्टी (अधिकार वार्ता प्रतिनिधी): “हातात तिकीट आलं म्हणजे निवडून आलोच” अशा फाजील आत्मविश्वासात हवेत तरंगणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे पाय होर्टीच्या जनतेने जमिनीवर आणले आहेत. होर्टी पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने असा काही ‘करंट’ दिला आहे की, विरोधकांना आता पराभवाची जखम कुरवाळत बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. काँग्रेसच्या वाघिणीने म्हणजेच सुवर्णा सिन्नप्पा गुंजीटे यांनी विजयाचा गुलाल उधळत विरोधकांचा सुफडा साफ केला आहे.

संजय गुंजीटेंनी दाखवलं ‘आभाळ’, विरोधक जमिनीवर!केवळ सत्तेची ऊब आहे म्हणून आपणच राजे, अशा अविर्भावात वावरणाऱ्यांना सिन्नप्पा (संजय) गुंजीटे यांनी राजकारण कसं असतं, याचा जिवंत धडाच शिकवला आहे. संजय गुंजीटेंच्या चाणक्यनीतीसमोर सत्ताधाऱ्यांचे सर्व डावपेच अक्षरशः कोलमडून पडले. त्यांनी विरोधकांना निवडणुकीच्या मैदानात असं काही फिरवलं की, आता त्यांना स्वतःचं तोंड लपवायलाही जागा उरलेली नाही.

वल्गना हवेत विरल्या, गुंजीटेंचा करिश्मा चालला!निवडणुकीपूर्वी मोठ्या बाता मारणारे आणि विजयाचे आकडे मोजणारे आज तोंडघशी पडले आहेत. होर्टीच्या जनतेने विकासाची कास धरणाऱ्या आणि लोकांशी नातं जपणाऱ्या संजय गुंजीटेंच्या नेतृत्वावर मोहोर उमटवली आहे. सत्ताधाऱ्यांच्या ‘पैसा आणि सत्ते’च्या मस्तीला काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याने सुरुंग लावला असून, सुवर्णा गुंजीटे यांचा विजय हा हुकूमशाहीच्या विरोधात मिळालेला मोठा विजय मानला जात आहे.

मिरची कोणाला झोंबली? या निकालामुळे होर्टीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. “तिकीट मिळालं की जिंकलो” असं समजून गुलाल विकत घेऊन ठेवणाऱ्यांच्या स्वप्नांचा गुंजीटेंनी चक्काचूर केला आहे. आता पराभवाच्या या मिरच्या कुणाकुणाला झोंबतात आणि कोण कुठे लपून बसतं, हे संपूर्ण गाव उघड्या डोळ्यांनी बघत आहे.

Leave a Comment