प्रभाग १० मध्ये दिसतोय आपचा गुलाल.


पिंपरी–चिंचवड (अधिकार वार्ता प्रतिनिधी): पिंपरी–चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये आम आदमी पार्टीकडून काढण्यात आलेल्या भव्य आणि आक्रमक पदयात्रेने संपूर्ण राजकीय समीकरणे ढवळून काढली.वर्षानुवर्षे सत्तेत बसूनही प्रभागाला मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या माजी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ‘आप’ने थेट रणशिंग फुंकले.“माझं काम दाखवा, मग मत मागा!” या एकाच घोषणेखाली निघालेल्या या पदयात्रेत आपचे उमेदवार श्री. गौतम तायडे आणि श्री. ब्रह्मानंद जाधव यांनी नाव न घेता पण नेमक्या शब्दांत विरोधकांची जिरवणूक केली.
“पंधरा–वीस वर्ष सत्ता उपभोगली, निधी कोट्यवधींचा आला…पण आजही नागरिक चिखलातून चालत असतील,नळाला पाणी नसेल,ड्रेनेज रस्त्यावर वाहत असेल,तर हा विकास नाही, ही जनतेची फसवणूक आहे!”— असा घणाघात उमेदवारांनी केला.
‘फक्त भाषणं केली, काम शून्य’आपच्या उमेदवारांनी थेट सवाल उपस्थित करत सांगितले की,“निवडणूक आली की झेंडे, बॅनर आणि मोठमोठे शब्द…पण निवडणूक गेली की प्रभागाला वाऱ्यावर सोडायचं!हेच राजकारण जनतेने अनेक वर्षे पाहिलं आहे.”या पदयात्रेतून विरोधकांच्या तथाकथित विकासकामांचा पर्दाफाश करण्यात आला.“आज अचानक विकासाची आठवण येतेय,मग इतकी वर्षे कुठे गायब होते?”असा सवाल उपस्थित करत विरोधकांवर थेट टोमणे मारण्यात आले.रस्ते, पाणी, ड्रेनेज – सगळीकडे अपयश.
इंदिरानगर, दत्तनगर, शंकरनगर, निगडी–भोसरी रोड, संभाजीनगर, शाहूनगर, केएसबी चौक, मोरवाडी, महाड सोसायटी परिसरातून गेलेल्या या पदयात्रेत नागरिकांनी स्वतः पुढे येत समस्या मांडल्या. कुठे रस्ते फुटलेले,कुठे ड्रेनेज उघडी,कुठे पाणीपुरवठा अपुरा,तर कुठे कचऱ्याचे ढीग —हे सगळं पाहून ‘हा विकास कुणाचा?’ असा प्रश्न उपस्थित झाला.‘जनतेला गृहीत धरू नका’आपच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की,“जनता आता मुकाट्याने सहन करणारी राहिलेली नाही.फोटोशूट, उद्घाटनं आणि खोटे श्रेययावर आता कुणाचाही विश्वास राहिलेला नाही.”
“आम्ही सत्तेसाठी नाही,प्रभागाच्या स्वाभिमानासाठी निवडणूक लढतोय.आणि म्हणूनच विरोधकांना सत्य अस्वस्थ करत आहे,”असे ठाम मत उमेदवारांनी व्यक्त केले.घोषणांनी परिसर दणाणलापदयात्रेदरम्यान‘काम नाही तर मते नाही’, ‘भ्रष्टाचारमुक्त प्रभाग हवा’, ‘खोट्या विकासाला उत्तर द्या’अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.राजकीय वर्तुळात खळबळ आपच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक १० मधील निवडणूक लढत निर्णायक वळणावर आली असून, विरोधक बचावात्मक भूमिकेत गेल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.