महाराष्ट्राच्या राजकारणात जिथे सत्तेसाठी चढाओढ सुरू असते, तिथे कचरू सगट यांनी आपल्या कृतीतून ‘माणुसकी हीच सर्वश्रेष्ठ’ असल्याचा संदेश दिला आहे.

शहापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी):राजकीय रणधुमाळीत एकमेकांवर वार-पलटवार होणे सामान्य असले, तरी महाराष्ट्राच्या मातीतील राजकीय सुसंस्कृतपणा आजही जिवंत असल्याचे उदाहरण शहापूर जिल्हा परिषद गटात पाहायला मिळाले. शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार कचरू सगट यांनी आज आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला होता. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी धडकताच, सगट यांनी चालू प्रचार अर्ध्यावर थांबवून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
प्रचाराचा नारळ फोडला, पण माणुसकीसाठी थांबले आज सकाळीच कचरू सगट यांनी शहापूर जिल्हा परिषद गटातून मोठ्या उत्साहात आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात प्रचाराचा नारळ फोडला होता. जनसंपर्क मोहिमेला जोमाने सुरुवात झाली असतानाच, अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी सर्वत्र पसरली. ही बातमी ऐकताच कचरू सगट स्तब्ध झाले. त्यांनी तात्काळ आपल्या सर्व पदयात्रा आणि नियोजित सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भरल्या डोळ्यांनी वाहिली श्रद्धांजली निवडणुकीचे रणांगण समोर असतानाही, कचरू सगट यांनी राजकीय ईर्ष्या बाजूला ठेवली. भरल्या डोळ्यांनी त्यांनी अजित दादांच्या कार्याचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. “राजकारण आपल्या जागी आहे, पण अजित दादांसारख्या कणखर नेतृत्वाचे जाणे हे राज्याचे मोठे नुकसान आहे. अशा दुःखाच्या प्रसंगी प्रचार करणे माझ्या मनाला पटले नाही,” अशी भावना सगट यांनी यावेळी व्यक्त केली.
शहापुरात कचरू सगट यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक कचरू सगट यांच्या या कृतीने संपूर्ण तालुक्यात त्यांच्याबद्दल आदराची लाट निर्माण झाली आहे. केवळ मतं मिळवण्यासाठी नाही, तर माणुसकी जपण्यासाठी राजकारणात आलेला असा संवेदनशील उमेदवार म्हणून आता त्यांची ओळख अधिक गडद झाली आहे. प्रतिस्पर्धी गटातील कार्यकर्त्यांनीही त्यांच्या या भूमिकेचे मनापासून स्वागत केले आहे.