‘शेतकऱ्यांच्या शेतात विहीर अन् बोअरवेल; हीच माझी जुबान!’ कचरू सगट यांच्या आश्वासनाने शहापूरच्या मातीतील शेतकरी सुखावला

Pranesh

कचरू सगट यांची ही ‘पाणीदार’ जुबान निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

शहापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): “निवडणुका येतील आणि जातील, पण माझ्या मातीतील शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे. माझ्या गटातील, गावा गावातील आणि वाड्या-वस्त्यांवरील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात हक्काची विहीर किंवा बोअरवेल खोदून देणार, ही कचरू सगटची जुबान आहे,” असा शब्द शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शहापूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार कचरू सगट यांनी मतदारांना दिला. त्यांच्या या रोक ठोक भूमिकेमुळे संपूर्ण मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत.

शहापूर जिल्हा परिषद गटातील प्रचाराचा धडाका सुरू असताना, कचरू सगट यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. केवळ घोषणाबाजी न करता, ग्रामीण भागातील पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतीला पाणी मिळाले तरच शेतकरी प्रगती करेल, हा विचार मांडत त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला विहीर किंवा बोअरवेलची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

“कचरू, तू अगोदर का थांबला नाय रे… “सगट यांच्या या आश्वासनानंतर एका अनुभवी मुरब्बी शेतकऱ्याने व्यक्त केलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “कचरू, तू अगोदर का थांबला नाय रे मतदानाला? तू एकट्याने फक्त शेतकऱ्याचा विचार केलास. तू आमचा माणूस आहेस आणि आता आम्ही तुलाच मतदान करणार,” अशा शब्दांत त्या शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

मतदारांचा वाढता पाठिंबा केवळ आश्वासने देऊन विसरणाऱ्या नेत्यांच्या गर्दीत, कचरू सगट यांनी थेट शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी आपुलकी पाहायला मिळत आहे. “आमच्या पाठीशी उभा राहणारा माणूस आम्हाला मिळाला आहे,” असे म्हणत गटातील सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांनी कचरू सगट यांना भरभरून आशीर्वाद दिले.

या प्रतिसादामुळे शहापूर जिल्हा परिषद गटात शिवसेना (ठाकरे गट) भक्कम स्थितीत असून, कचरू सगट यांची ही ‘पाणीदार’ जुबान निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Comment