“जळकोटचा ‘कौल’ ठरला! आश्वासनांच्या ‘बाजारा’पेक्षा प्रतिक्षा सुरवसेंच्या ‘शिक्षणाला’ पसंती; विरोधकांचे तंबू उखडणार!”

Pranesh

जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी): निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच जळकोट जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र, यंदा या गटात केवळ लाट नाही, तर विकासाची आणि सुशिक्षित नेतृत्वाची ‘त्सुनामी’ येताना दिसत आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रतिक्षा गोपाळ सुरवसे यांनी आपल्या झंझावाती प्रचारामुळे विरोधकांची झोप उडवली असून, गटात आता काँग्रेसचाच झेंडा फडकणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.

घरोघरी ‘प्रतिक्षा’, विरोधकांना फुटला घाम! गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा सुरवसे यांनी गटातील प्रत्येक गावातील, प्रत्येक घराघरातील महिलांची प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला आहे. केवळ भाषणांची ‘फेका फेकी’ करणाऱ्या नेत्यांच्या काळात, एक उच्चशिक्षित महिला आपल्या दारात येऊन आस्थेने विचारपूस करतेय, हे पाहून मतदार भारावून गेले आहेत. त्यांच्या या ‘डोअर टू डोअर’ कनेक्टमुळे प्रस्थापित विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

शिक्षण आणि सक्षमीकरणाचा ‘मास्टरप्लॅन’. प्रतिक्षा सुरवसे या केवळ राजकारण करण्यासाठी मैदानात उतरल्या नाहीत, तर त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न, मुलींचे सक्षमीकरण आणि त्यांच्या नोकरीसाठी लागणारे मार्गदर्शन यावर त्या ठोस भूमिका मांडत आहेत. “आमची मुलं शिकणार आणि स्वतःच्या पायावर उभी राहणार” हा त्यांचा निर्धार मतदारांच्या काळजाला भिडला आहे.

79471 1

विरोधकांना टोमणा: “हवेतील गप्पा बंद करा, आता कामाची माणसं येणार! ज्यांनी आजवर केवळ सत्तेची ऊब घेतली आणि निवडणुका आल्या की आश्वासनांची गाजरं दाखवली, अशा विरोधकांना आता मतदारांनीच घरचा रस्ता दाखवण्याची तयारी केली आहे. “दहा तोंडाने बोलण्यापेक्षा, एक सुशिक्षित विचार सामान्यांच्या कल्याणासाठी पुरेसा असतो,” असा टोला आता चौकाचौकात लगावला जात आहे. केवळ गाड्यांचा ताफा फिरवून निवडणुका जिंकता येत नाहीत, तर लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करावं लागतं, जे प्रतिक्षा सुरवसे यांनी करून दाखवलं आहे.

निकालाची केवळ औपचारिकता बाकी? गटातील आबालवृद्धांपासून ते तरुणांच्या मुखी सध्या एकच नाव आहे— प्रतिक्षा गोपाळ सुरवसे! त्यांच्या बोलण्यातील आपुलकी आणि कामाची जिद्द पाहता, काँग्रेसचा तिरंगा जळकोट जिल्हा परिषदेवर डौलाने फडकणार यात शंका उरलेली नाही. आता विरोधकांनी हार स्वीकारून केवळ ‘निकालाची’ प्रतीक्षा करावी, असेच चित्र सध्या दिसत आहे.

Leave a Comment