शहापूरचे रणसंग्राम: ‘विकासाचा’ ध्यास की ‘गुन्हेगारी’ डागांची सावली? सुनील बनसोडेंच्या उमेदवारीने चर्चांना उधाण

Pranesh

शहापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): निवडणुकीचे बिगुल वाजताच शहापूर गटात राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे शिवसेना (शिंदे गट) कडून सुनील बनसोडे यांनी ‘विकासाचा ध्यास’ घेतल्याचा दावा करत शड्डू ठोकला आहे, तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) कडून कचरू सगट यांनी आपल्या चळवळीतील अनुभवाच्या जोरावर मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, या लढतीत सुनील बनसोडे यांची ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’ हा सध्या मतदारांमध्ये सर्वात मोठा चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरत आहे.

भूतकाळाचा विसर पडेल का? सुनील बनसोडे सध्या विकासाच्या गप्पा मारत असले, तरी त्यांच्या नावावर असलेले गुन्हेगारीचे शिक्के पुसले गेलेले नाहीत. “ज्या हातांनी कायद्याला बगल दिली, ते हात आता सामान्यांचे भविष्य कसे सावरणार?” असा खोचक सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. गुन्हेगारी विसरून समाजकार्य करण्याचा दावा करणे सोपे असले, तरी मतदारांच्या मनातील भीती आणि अविश्वास दूर करणे हे बनसोडेंसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

चळवळीतील कार्यकर्ता विरुद्ध ‘डागी’ नेतृत्व दुसरीकडे, कचरू सगट यांची प्रतिमा ही चळवळीतून आलेला एक साधा कार्यकर्ता, जो गोरगरिबांच्या सुख-दुःखात कायम सहभागी असतो, अशी आहे. त्यामुळे, एका बाजूला गुन्हेगारीचा वारसा असलेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला जनतेशी नाळ जोडलेला कार्यकर्ता, अशी ही स्पष्ट विभागणी दिसत आहे.

शहापूरची जनता काय ठरवणार? विकासाच्या नावाखाली गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण शहापूरची जनता स्वीकारणार का? की स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला पसंती देऊन दहशतीचे राजकारण मोडीत काढणार? हे पाहणे औचित्याचे ठरेल. बनसोडे यांनी कितीही ‘विकासाचा’ मुखवटा चढवला, तरी त्यांच्या पाठीशी असलेला गुन्हेगारीचा इतिहास त्यांना या निवडणुकीत नक्कीच टोचत राहणार, हे मात्र निश्चित.

Leave a Comment