ही निवडणूक जात, धर्म किंवा द्वेषाची नाही; ही निवडणूक माणुसकी, समानता आणि विकासाची आहे

काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): काक्रंबा जिल्हा परिषद गटात वंचित बहुजन आघाडीचे दमदार दावेदार मिलिंद रोकडे फक्त सत्ता, मतं आणि जातीची गणितं याभोवती फिरणाऱ्या राजकारणाच्या गर्दीतून समाजकारणाचा ठाम आवाज बुलंद करणारे नेतृत्व म्हणजे मिलिंद सोमनाथ रोकडे. आपल्या दीर्घकालीन समाजकार्याच्या जोरावर, उच्चशिक्षित असतानाही गरिबीची तीव्र जाण ठेवणारे आणि वेळोवेळी प्रत्येक गरजूच्या मदतीला धावून जाणारे मिलिंद रोकडे आज काक्रंबा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रभावी दावेदार म्हणून पुढे आले आहेत.
आजच्या राजकारणात मतांसाठी समाजात जाती-धर्मात विष पेरण्याचे काम खुलेआम सुरू आहे. मात्र अशा वातावरणातही मिलिंद रोकडे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे —“राजकारण मतांसाठी समाज तोडेल, पण आम्ही समाज जोडू. हिंदू-मुस्लिम भाऊभाऊ, आपला गट — आपण एकत्र राहू!”
हा नारा केवळ भाषणापुरता मर्यादित नसून, त्यांच्या प्रत्यक्ष समाजकार्याचा तो अनुभव आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, गरिबांचे प्रश्न, शोषित-वंचितांचे हक्क असोत किंवा अचानक आलेली अडचण — मिलिंद रोकडे नेहमीच ‘पहिला फोन आणि शेवटचा आधार’ म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच ते जनतेमध्ये नेता म्हणून नव्हे, तर आपला माणूस म्हणून स्वीकारले गेले आहेत.
उच्चशिक्षित असतानाही जमिनीवर काम करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. गरिबी काय असते, उपेक्षा काय असते आणि व्यवस्थेने दुर्लक्षित केल्यावर माणसाला किती वेदना होतात, हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. म्हणूनच त्यांच्या राजकारणात दिखावा नाही, तर समवेदना आहे; घोषणाबाजी नाही, तर कृती आहे.
काक्रंबा जिल्हा परिषद गटात आतापर्यंत मतांसाठी समाजात फूट पाडणाऱ्या, निवडणूक संपली की जनतेकडे पाठ फिरवणाऱ्या राजकारणाला कंटाळलेली जनता आता एकजुटीच्या, विकासाच्या आणि माणुसकीच्या राजकारणाकडे पाहत आहे. आणि याच अपेक्षेचं नाव म्हणजे — मिलिंद रोकडे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की,ही निवडणूक जात, धर्म किंवा द्वेषाची नाही; ही निवडणूक माणुसकी, समानता आणि विकासाची आहे. आज काक्रंबा गटात ही लढत केवळ उमेदवारांची नसून, फूट पाडणाऱ्या राजकारणाविरुद्ध एकजुटीच्या विचारांची लढाई बनली आहे.
आता प्रश्न एकच —विष पेरणारे राजकारण की समाज जोडणारे नेतृत्व? काक्रंबाची जनता कोणाच्या पाठीशी उभी राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.