काक्रंब्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार; रामचंद्र ढवळे आणि उमेश रमेश पंडागळेंचा ‘जलक्रांती’चा ठाम निर्धार विरोधकांच्या अपयशावर शिक्कामोर्तब!

Pranesh

Updated on:

ढवळे–पंडागळे जोडीबद्दल सकारात्मक चर्चा गावागावात सुरू झाली आहे.

काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): काक्रंबा परिसरातील ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे पाण्यासाठी भोगलेल्या हाल अपेष्टांना आता पूर्णविराम मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण, उन्हाळ्यातील टँकरराज आणि शेतीसाठी अपुरे पाणी— या सगळ्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रामचंद्र दौलतराव ढवळे आणि उमेश रमेश पंडागळे यांनी ‘जलक्रांती’चा ठाम निर्धार जाहीर केला आहे.

पाण्याचा प्रश्न हा केवळ तात्पुरत्या उपायांनी सुटणारा नाही, हे ओळखून रामचंद्र ढवळे यांनी सखोल अभ्यासातून ठोस आणि दीर्घकालीन आराखडा तयार केला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून जलसंधारणाची व्यापक कामे, पाणीसाठवण प्रकल्प आणि प्रत्येक गावापर्यंत पोहोचणारे पाईपलाईनचे मजबूत जाळे उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

आजवर पाण्याच्या प्रश्नावर केवळ सभा, निवेदने आणि आश्वासनांची सरबराई करणाऱ्या विरोधकांची मात्र या मुद्द्यावर चांगलीच पंचाईत झाली आहे. घोटभर पाण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरावे लागले, पण सत्तेत असताना विरोधकांनी पाण्याची फाईलही हलवली नाही, असा थेट आरोप आता ग्रामस्थ उघडपणे करू लागले आहेत.

ढवळे–पंडागळे जोडीने मात्र पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी सिंचन—या दोन्ही आघाड्यांवर समांतर काम करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. जलसंधारण, बंधारे, नालाबांधणी, पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा आणि पाण्याचा शाश्वत वापर, हा या ‘जलक्रांती’चा केंद्रबिंदू आहे. पाणी म्हणजे निवडणुकीपुरते आश्वासन नव्हे, तर जीवनाचा मूलाधार आहे, ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली आहे.

या ठोस घोषणांमुळे काक्रंबा परिसरात आशेचे वातावरण निर्माण झाले असून, महिला, शेतकरी आणि तरुण वर्गात विशेष उत्साह दिसून येत आहे. “घोटभर पाण्यासाठीची वणवण आता थांबणार, कारण हक्काचा माणूस सत्तेवर येणार” असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत असून, ढवळे–पंडागळे जोडीबद्दल सकारात्मक चर्चा गावागावात सुरू झाली आहे.

दुसरीकडे, पाण्याचा प्रश्न कायम प्रलंबित ठेवून त्यावर राजकारण करणाऱ्या विरोधकांकडे आता उत्तर उरलेले नाही. काम शून्य, पण आरोप शंभर अशीच त्यांची अवस्था झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. एकीकडे पाण्यासाठी ठोस आराखडा, अनुभवी नेतृत्व आणि अंमलबजावणीची तयारी, तर दुसरीकडे विरोधकांची अपयशी कामगिरी—हा फरक आता जनतेच्या लक्षात आला आहे. त्यामुळेच काक्रंब्यात ‘जलक्रांती’ केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

काक्रंब्याचा पाणीप्रश्न मिटवण्याचा निर्धार करणारी ढवळे–पंडागळे जोडी विकासाच्या लढाईत पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचे चित्र ठळक होत आहे.

Leave a Comment