निवडणुकीच्या धावपळीतही जपले संतांचे विचार; काक्रंब्यात ठाकरे गटाच्या उमेदवारांचा विरोधकांना जोरदार टोला!

Pranesh

83262 edited

काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या वातावरणात सध्या सर्वत्र आरोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, काक्रंबा परिसरात मात्र ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या उमेदवारांनी समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार रामचंद्र ढवळे आणि पंचायत समितीचे उमेदवार उमेश पंडागळे यांनी संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करून, राजकारणाच्या पलीकडे जात सामाजिक ऋणाची जोपासना केली आहे.

“संतांचे विचार विसरलात, आता जनतेचा विकास काय करणार?”आजच्या निवडणुकीच्या चढाओढीत अनेक नेते सामाजिक कार्य आणि संतांचे महान विचार विसरून फक्त सत्ताप्राप्तीसाठी धावत आहेत. अशा परिस्थितीत ढवळे आणि पंडागळे यांनी मात्र संत रोहिदास महाराजांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. “केवळ मतांचे राजकारण करून समाज सुधारणार नाही, तर संतांच्या विचारांवर चालूनच समाजाचे रक्षण आणि विकास शक्य आहे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विरोधकांच्या छावणीत धडकी! ठकरे गटाच्या या ‘संस्कारशील’ प्रचारामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. केवळ विकासकामांच्या गप्पा मारणाऱ्या विरोधकांना रामचंद्र ढवळे यांनी आरसा दाखवला आहे. “आम्ही आणि जनता एकजूट होऊन विकास कामे करूच, पण तो विकास संतांच्या शिकवणीवर आधारित असेल,” असे ठणकावून सांगत त्यांनी विरोधकांना निवडणुकीच्या मैदानात चितपट करण्यासाठी कंबर कसली आहे.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “एकच जिद्द, एकच ध्यास, काक्रंब्याचा विकास!” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. संतांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या पाठिंब्याने या दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीत मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Comment