शहापूर गटात टोमण्यांचा पाऊस; ‘कलमांची वही’ विरुद्ध ‘कामाची वही’ — कचरू सगटच्या विजयाचे वारे प्रबळ

Pranesh

84670 1

शहापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): शहापूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक आता केवळ दोन उमेदवारांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती दोन विचारधारांची थेट लढाई बनली आहे. एका बाजूला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुनील बनसोडे, ज्यांची ओळख सध्या “कलमांच्या भवऱ्यात अडकलेली उमेदवारी” अशी गावकऱ्यांमध्ये चर्चिली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कचरू सगट ; ज्यांनी गरीबीचे चटके सहन करत समाजासाठी झटत आपले आयुष्य खर्ची घातले.

सुनील बनसोडे यांच्या उमेदवारीकडे पाहताना गावकऱ्यांमधून उपरोधिक टोमणे ऐकायला मिळत आहेत. “विकासाच्या फाईल्स उघडणार की आधी कलमांची यादी वाचणार?”

“जिल्हा परिषद आहे की पोलीस स्टेशन?” असे सवाल चर्चा आणि चौकात उघडपणे केले जात आहेत.

“हे जिल्हा परिषद सदस्य व्हायला उभे आहेत की कलमांची माहितीपत्रक वाटायला?”

“निवडून आल्यावर पहिला प्रस्ताव विकासाचा की वकिलांचा?”

“पाणी, रस्ता सोडा; आधी केस कोणत्या तारखेला आहेत ते सांगा!” अशा खोचक टिप्पणींनी वातावरण तापले आहे.(ही मते व चर्चा स्थानिक नागरिकांमधील असून दोषसिद्धीचा दावा नाही.)

याउलट, कचरू सगट यांची कहाणी थेट जनतेच्या काळजाला हात घालणारी आहे. स्वतःचे शिक्षण परिस्थितीमुळे अपूर्ण राहिले, पण कोणीही अशिक्षित राहू नये यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मदत केली. गरिबी अनुभवलेली असल्यामुळेच पाणी, वीज, रस्ते, शाळा आणि रोजगार यांचे महत्त्व त्यांनी जमिनीवर उतरवून दाखवले. “मी बोलत नाही, मी करतो” हीच त्यांची ओळख बनली आहे.

आज शहापूर गटात वातावरण स्पष्ट आहे. वाद, टोमणे आणि प्रश्नचिन्हे एका बाजूला; तर विश्वास, कष्ट आणि विकासाची दिशा दुसऱ्या बाजूला. त्यामुळेच सर्व बाजूंनी कचरू सगट यांच्या विजयाचे वारे वाहत असून, शहापूर जिल्हा परिषद गटात परिवर्तनाचा झेंडा उंचावण्याची वेळ जवळ आल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Comment