“इतकी वर्षे सत्ता तुमच्याकडे, मग ग्रामीण भाग तहानलेला आणि रस्ते विरहित का? विकास फक्त जळकोट गावाचाच झाला, बाकी गावं अजूनही विकासाच्या प्रतीक्षेतच का?”

जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी): “विकास फक्त जळकोट गावाचाच झाला, बाकी गावं अजूनही विकासाच्या प्रतीक्षेतच का?” असा संतप्त सवाल आता जळकोट जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातून विचारला जात आहे. अनेक दशके सत्ता एकाच ‘विशिष्ट’ लोकांच्या हातात असूनही सामान्य जनतेच्या पदरी निराशाच पडली आहे. या प्रस्थापित राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी आणि लोकशाही खऱ्या अर्थाने गावपातळीवर नेण्यासाठी आता काँग्रेसचे शिलेदार प्रतीक्षा गोपाळ सुरवसे आणि मोहन मानसिंग चव्हाण यांनी रणशिंग फुंकले आहे.
हंगरगा नळ गावावर अन्याय: आश्वासनांची केवळ ‘खेरात’लोकसंख्येच्या बाबतीत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हंगरगा नळ गावाचा वापर केवळ मतपेटीसाठी झाला की काय? असा प्रश्न पडत आहे. निवडणुकीच्या वेळी दहा हातांनी आश्वासने देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या वेळी मात्र १० टक्केही विकास केला नाही. रस्ते, पाणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी इतकी वर्षे ‘मौन’ का होते, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
कर्तृत्ववान सरपंच मैदानात: कामाचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ सोबत!विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या पोकळ आश्वासनांना छेद देण्यासाठी काँग्रेसने (चिन्ह: पंजा) दोन खंबीर नेतृत्व मैदानात उतरवली आहेत:
१. प्रतीक्षा गोपाळ सुरवसे (जि. प. उमेदवार): मुर्टा गावच्या सरपंच म्हणून त्यांनी आपल्या गावात विकासाची गंगा आणली. केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामविकासासाठी त्यांनी झोकून देऊन काम केले आहे. याच अनुभवाच्या जोरावर त्या आता जिल्हा परिषदेत परिवर्तनासाठी सज्ज आहेत.
२. मोहन मानसिंग चव्हाण (पं. स. उमेदवार): हंगरगा गावचे उपसरपंच असताना त्यांनी केलेल्या विकासकामांची चर्चा आज संपूर्ण तालुक्यात आहे. विकासाचे ‘हंगरगा मॉडेल’ आता पंचायत समितीच्या माध्यमातून संपूर्ण गटात राबवण्यासाठी त्यांनी दंड थोपटले आहेत.
सत्ताधाऱ्यांनो, हिशोब द्या! “इतकी वर्षे सत्ता तुमच्याकडे, मग ग्रामीण भाग तहानलेला आणि रस्ते विरहित का?” असा थेट सवाल हे दोन्ही उमेदवार मतदारांच्या वतीने विचारत आहेत. एका विशिष्ट गटाच्या हातात अडकलेली सत्ता मोडीत काढून ती जनतेच्या दारात नेण्यासाठी ‘पंजा’ हे चिन्ह घेऊन हे दोन्ही उमेदवार घराघरात पोहोचत आहेत.
जळकोटच्या राजकारणात आता ‘प्रस्थापित विरुद्ध सामान्य जनता’ असा संघर्ष उभा ठाकला असून, प्रतीक्षा सुरवसे आणि मोहन चव्हाण यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.