
नांदगाव (अधिकार वार्ता प्रतिनिधी): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, नांदगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती सत्तेचा माज उतरवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष मैदानात उतरला आहे. जिल्हा परिषद गटातून तडफदार नेतृत्व सूर्यकांत सुभाष अरबळे आणि पंचायत समिती गणातून ज्योती भीमभाऊ मोरे यांनी कंबर कसली असून, त्यांच्या प्रचाराने भाजपच्या गोटात चांगलीच धडकी भरली आहे.
भाजपचा ‘भ्रष्टाचार’ आणि ‘अश्वासनांचा’ पाऊस; जनता मात्र बेहाल! गेल्या काही काळात भाजपने या गटात आणि गणात केवळ भ्रष्टाचाराचे इमले उभे केले आहेत. “सबका साथ, सबका विकास” म्हणणाऱ्यांनी केवळ आपल्या जवळच्या लोकांचा विकास केला, तर सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले. रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आजही नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. विकासाच्या नावाखाली आलेला निधी नेमका कोणाच्या खिशात गेला? असा रोखठोक सवाल आता गावकरी विचारू लागले आहेत.
शाळांची दुर्दशा आणि गरिबांचे शोषण ज्याशाळांतून उद्याचे भविष्य घडणार, त्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था भाजपच्या काळात अत्यंत दयनीय झाली आहे. मोडकळीस आलेली छपरे आणि सोयीसुविधांचा अभाव यामुळे गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे. गरिबांचे शोषण करून केवळ भांडवलदारांचे हित जोपासणाऱ्या भाजपला यावेळेस नंदगावची जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.
शेतकरी राजा फक्त आश्वासनांवरच जगणार का?शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपने केवळ ‘चुमण्या’ (पोकळ आश्वासने) दिल्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिचलेल्या शेतकऱ्याला ना मदत मिळाली, ना हमीभाव. केवळ कागदावरच्या योजनांचा गाजावाजा करून भाजप सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे.
मशाल पेटली, आता परिवर्तन नक्की! या सर्व अन्यायाचा पाढा वाचण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्धव साहेबांचे शिलेदार सूर्यकांत आरबळे आणि ज्योती मोरे सज्ज झाले आहेत. “आम्ही फक्त बोलत नाही, तर करून दाखवतो,” हा शिवसेनेचा बाणा घेऊन हे दोन्ही उमेदवार घराघरात पोहोचत आहेत. भ्रष्टाचाराची ‘कमळ’ चिखलात रुतवण्यासाठी आता ‘मशाल’ पेटली असून, नांदगावमध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत.