खड्डेमुक्त काक्रंबा आणि दर्जेदार रस्ते; विकासाचे व्हिजन घेऊन ढवळे-पांडगळे जोडी सज्ज – विरोधकांच्या अपयशावर ठळक बोट

Pranesh

Updated on:

काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): काक्रंबा मतदारसंघात वर्षानुवर्षे नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागला. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, पावसात चिखल आणि उन्हात धूळ—हीच ओळख बनलेली असताना, आता या परिस्थितीला पूर्णविराम देण्यासाठी ढवळे-पांडगळे जोडी विकासाचे ठोस व्हिजन घेऊन मैदानात उतरली आहे.

मतदारसंघातील रस्त्यांची बिकट अवस्था दूर करण्यासाठी उमेश रमेश पांडगळे यांनी कंबर कसत, “रस्ते हा विकासाचा कणा आहे” ही भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावाला जोडणारे डांबरी रस्ते, अंतर्गत वसाहतीतील रस्ते तसेच शेतरस्ते सुस्थितीत आणण्याचे सुस्पष्ट नियोजन या दोन्ही उमेदवारांनी मांडले आहे.

आजपर्यंत केवळ उद्घाटनांच्या फिती कापणारे, पण प्रत्यक्षात खड्डे बुजवण्यात अपयशी ठरलेले विरोधक या मुद्द्यावर उघडे पडले आहेत. रस्त्यांवरील खड्डे दिसले नाहीत, पण निवडणुकीत मतं मात्र दिसतात, अशा टोमण्यांचा सामना आता विरोधकांना करावा लागत आहे. ढवळे-पांडगळे जोडीने मात्र केवळ तात्पुरत्या डागडुजीवर न थांबता, दर्जेदार काम, टिकाऊ डांबरीकरण आणि दीर्घकालीन उपाययोजना यावर भर देण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना माल वाहतुकीसाठी सोयीचे शेतरस्ते, विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास आणि सामान्य नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते—हा या विकास मॉडेलचा केंद्रबिंदू आहे.

या विकासवादी भूमिकेमुळे काक्रंबा परिसरात सकारात्मक वातावरण तयार झाले असून, “रस्त्यांसाठी झगडणारे नव्हे, तर रस्ते करून देणारे नेतृत्व हवे” अशी भावना नागरिकांमध्ये बळावत आहे. गावागावात रस्त्यांच्या प्रश्नावर चर्चा रंगू लागली असून, ढवळे-पांडगळे जोडीचा अजेंडा लोकांच्या मनाला भिडताना दिसत आहे. दुसरीकडे, सत्तेत असताना रस्त्यांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवणारे विरोधक आता विकासाच्या गप्पा मारताना हास्यास्पद ठरत आहेत. काम शून्य, पण श्रेय घेण्याची घाई हीच त्यांची ओळख असल्याचा आरोप नागरिक उघडपणे करू लागले आहेत.

एकीकडे खड्डेमुक्त काक्रंबाचे स्वप्न, दर्जेदार आणि सुरक्षित रस्त्यांचा आराखडा, तर दुसरीकडे विरोधकांची अपयशी कामगिरी—हा फरक आता मतदारांच्या लक्षात येऊ लागला आहे. त्यामुळेच ‘रस्ते विकासाचे मॉडेल’ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात काक्रंब्यात उतरायला सज्ज झाले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. काक्रंबाचा विकास केवळ भाषणांत नव्हे, तर रस्त्यांवर दिसणार—हा विश्वास निर्माण करणारी ढवळे-पांडगळे जोडी आता विकासाच्या लढाईत आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Leave a Comment