एकीकडे आयपीसी कलमांच्या सावलीतील उमेदवारी, दुसरीकडे विकासाचा ठोस अजेंडा; शहापूर गटात जनतेची कसोटी

Pranesh

84666

शहापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): शहापूर जिल्हा परिषद गटात यंदाची निवडणूक केवळ पक्षीय लढत न राहता, विचार आणि विश्वासार्हतेची परीक्षा बनली आहे. एका बाजूला शिवसेना (शिंदे गट)कडून उभे असलेले उमेदवार सुनील बनसोडे, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना (ठाकरे गट)चे चळवळीतून घडलेले कार्यकर्ते कचरू सगट अशी स्पष्ट विभागणी मतदारांमध्ये दिसून येत आहे.

सुनील बनसोडे यांच्या उमेदवारीबाबत गावागावात चर्चा रंगली असून, उपलब्ध कागदपत्रांनुसार त्यांच्या नावावर आयपीसीसह विविध कायद्यांतर्गत नोंदी झाल्याचा उल्लेख असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. “ज्या उमेदवाराभोवती प्रश्नचिन्हे आहेत, तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कसा साधणार?”असा सवाल जनता उघडूपणे करत आहे.

याउलट, कचरू सगट हे वादांपेक्षा कामावर विश्वास ठेवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. ते सध्या विकासाचे मुद्दे घेऊन घराघरांत पोहोचत असून, पाणीपुरवठा, वीज, मजबूत रस्ते, दर्जेदार जिल्हा परिषद शाळा यासोबतच युवकांसाठी रोजगार हा त्यांचा प्रमुख अजेंडा आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये युवकांना स्वखर्चाने काम मिळवून देण्याची हमी देत, त्यांनी तरुण वर्गात आशा निर्माण केली आहे.

एकीकडे केसच्या फाईल्सची चर्चा, तर दुसरीकडे विकासाच्या फाईल्सचा आराखडा — त्यामुळे शहापूर जिल्हा परिषद गटात मतदारांसमोर निवड स्पष्ट होत आहे. आता जनता ठरवणार आहे की, वादग्रस्त पार्श्वभूमीला संधी द्यायची की विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कार्यकर्त्याला.

Leave a Comment