काक्रंब्यात ‘निळ्या’ शक्तीचा ‘मशाली’ला एल्गार; विरोधकांच्या गोटात धडकी, राजकीय समीकरणांचे धिंडवडे!

Pranesh

काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): काल तुळजापूर तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या काक्रंबा जिल्हा परिषद गट क्रमांक ३५ मध्ये निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच, एक मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. स्वतःला अजेय समजणाऱ्या आणि सत्तेच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांच्या स्वप्नांचा पार चक्काचूर झाला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अ‍ॅड. रामचंद्र ढवळे आणि उमेश पांडागळे यांना ‘मशाल’ चिन्हावर जाहीर पाठिंबा घोषित केल्याने काक्रंब्यात आता नवा इतिहास लिहिला जाण्याचे संकेत मिळत आहेत.

जातीयवादी शक्तींच्या नाकावर टिच्चून ‘भीम-शिव’ शक्ती एकत्र! निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या आणि समाजा–समाजात भिंती उभ्या करणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तींना आरसा दाखवण्याचे काम रिपाइं (आठवले गट) ने केले आहे. तुळजापूर शहराध्यक्ष आयु. वैजिनाथ पांडागळे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना नेत्यांनी विरोधकांचा समाचार घेताना स्पष्ट केले की, “आमचा लढा हा केवळ खुर्चीसाठी नसून सामाजिक समतेसाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या रक्षणासाठी आहे. जे लोक केवळ निवडणुकी पुरते जनतेचे पाय धरतात, त्यांना यावेळी काक्रंबा गटातील जनता आपली जागा दाखवून देईल.”

ढवळे—पांडागळेंचे ‘कर्तृत्व’ आणि विरोधकांचे ‘अस्तित्व’! अ‍ॅड. रामचंद्र ढवळे आणि उमेश पांडागळे सर यांनी आजवर समाजासाठी केलेले निस्वार्थ कार्य आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त राबवलेले प्रबोधनात्मक उपक्रम हे त्यांच्या विजयाची खरी शिदोरी आहे. दुसरीकडे, विरोधकांकडे केवळ पोकळ आश्वासने आणि गटातटाचे राजकारण उरले आहे. अ‍ॅड. ढवळे आणि उमेश पांडागळे यांच्या पाठीशी रिपाइं उभी राहिल्याने आता कांबवा (काक्रंबा) गटातील आंबेडकरी आणि पुरोगामी मतदारांनी एकमुखी ‘मशाली’ला साथ देण्याचा निर्धार केला आहे. यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन पुरती सरकली असून त्यांच्या गोटात आता चिंतेचे वातावरण पसरले आहे.

महायुतीची मदार आता केवळ आरोपांवरच? केवळ अ‍ॅड. ढवळेच नव्हे, तर पंचायत समितीसाठी उमेश पांडागळे आणि सलगरा दिवटी गटातून श्याम सुंदर फुलमाळी यांनाही विजयी करण्याचे आवाहन करून रिपाइंने पूर्ण पॅनेललाच ताकद दिली आहे. या निर्णयामुळे विरोधकांचे राजकीय गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. “निवडणूक पैशाच्या जोरावर नाही, तर विचारांच्या जोरावर जिंकली जाते,” असा टोला लगावत रिपाइंच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना ‘मशाल’ पेटवण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने महासंग्राम सुरू: यावेळी वैजिनाथ पांडागळे (शहराध्यक्ष), सुभाष कदम, तानाजी कदम (जिल्हा सहसचिव), धमशिल कदम (जिल्हा युबक कार्याध्यक्ष), प्रताप कदम (जिल्हा उपाध्यक्ष), शुभम कदम, बाबासाहेब भसके (जिल्हा कार्याध्यक्ष), विधानंद बनसोडे (जिल्हाध्यक्ष), आनंद पांडागळे (मराठवाडा प्रदेश कार्याध्यक्ष), संजय बनसोडे (सचिव) आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीने या पाठिंब्याला अधिक धार चढली. रिपाइंच्या या निर्णायक भूमिकेमुळे काक्रंबा गटात आता केवळ ‘मशाल’ धगधगणार असून, विरोधकांना आता पराभवाची धास्ती सतावू लागली आहे. प्रचाराचा हा नवा वळणदार प्रवास आता मतपेटीतून कोणाला बाहेर फेकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Comment