मुर्टा’चा कायापालट करणारा ‘विकासपुरुष’ आता जळकोट गटाच्या मैदानात; लोकप्रतिनिधी असावा तर असा! सत्तेसाठी नाही, तर सेवेसाठी धावणारे व्यक्तिमत्व ‘गोपाळ सुरवसे

Pranesh

70817

जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी): राजकारणाच्या नावाखाली फक्त स्वतःची घरे भरणारे आणि निवडणुका आल्या की आश्वासनांची गाजरं दाखवणारे ‘टाईमपास’ नेते आता जळकोट गटातून गाद्या गुंडाळण्याच्या तयारीत आहेत. कारण, तुळजापूरच्या मातीतला एक असा हिरा जळकोट गटाच्या मैदानात उतरला आहे, ज्याने राजकारण नव्हे, तर ‘समाजकारण’ करून अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. मुर्टा गावचे सरपंच गोपाळ सत्यवान सुरवसे यांच्या पत्नीच्या उमेदवारीने जळकोट गटात भूकंपाचे वातावरण असून, नुसत्या गप्पा मारणाऱ्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

विरोधकांनो, आधी ‘मुर्टा’ जाऊन बघा, मग बोला!

जे विरोधक आज टीका करायला सरसावले आहेत, त्यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी एकदा मुर्टा गावात जाऊन तिथला विकास डोळे उघडून पहावा. ज्या भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागायची, तिथे आज नळाला शुद्ध पाणी येतेय. जिथे चिखलाचे रस्ते होते, तिथे आज चकाचक सिमेंट रस्ते आणि भूमिगत गटारींचे जाळे पसरले आहे.

केवळ कागदावर योजना नाचवणाऱ्या नेत्यांना सुरवसे यांनी आपल्या कर्तृत्वाने आरसा दाखवला आहे. दुष्काळी भागात द्राक्ष बागा आणि भाजीपाल्याचे मळे फुलवून त्यांनी शेतकऱ्यांच्या हातात पैसा दिला. ही किमया करण्यासाठी फक्त निधी लागत नाही, तर तो खर्च करण्याची प्रामाणिक नियत लागते, जी गोपाळ सुरवसे यांच्याकडे ठासून भरलेली आहे. जो गावासाठी, गावाच्या नावासाठी प्रामाणिकपणाने, एकनिष्ठतेने स्वतःसोबत अन्य शेतकऱ्यांचे भवितव्य घडवतो समाजसेवकांना जनता का नाकारेल? जो कुठल्या पदाची या पैशाची अपेक्षा न करणारा माणूस जर सत्तेत आला तर खरोखर गटाचा व गटातील प्रत्येक शेतकऱ्याचा स्वाभिमान बनेल यात शंका नाही.

एखादा सुशिक्षित जिज्ञासू व्यक्तिमत्वाला जर जनतेने संधी दिली तर कायापलट होण्याशी राहिला. गेले कित्येक वर्ष मतदार हा सत्तेच्या लालचांकडून फक्त आश्वासने ऐकत राहिला आहे. पण आता मात्र तसे होणार नाही. जनतेला आश्वासने न देता काम करून देणारा नेता म्हणून आज गोपाळ सुरवसे यांच्याकडे लोक आशेने पाहत आहेत. पण गोपाळ सुरवसे हे काम करतील का? का पाठीमागच्या सत्ताधाऱ्यांसारखे खिसा भरतील हा देखील प्रश्न मतदारांना उद्भवत आहे. कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला माती चारायचं हे मतदाराच्या हातात आहे.

बघा आता… कामाच्या माणसाला साथ द्यायची की फक्त गप्पा मारणाऱ्यांच्या नादी लागायचे? जळकोटची जनता आता ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ करणार!

Leave a Comment