
जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी): जळकोट पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असताना, उमेदवार आशिष सोनटक्के यांनी आपल्या कौशल्याने निवडणुकीचे चित्र पालटून टाकले आहे. काही दिवसांपूर्वी विविध कारणांमुळे त्यांच्यावर नाराज असलेला गट आता पुन्हा आशिष सोनटक्के यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा ठाकला असून, नागरिकांकडून त्यांना ‘विजयी भव’चा आशीर्वाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
जळकोट गणात काही स्थानिक मुद्द्यांमुळे जनता आशिष सोनटक्के यांच्यावर काहीशी नाराज होती. ही नाराजी निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकते, अशी चर्चाही रंगली होती. मात्र, विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत सोनटक्के यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली. त्यांनी प्रत्येक गावाचा आणि गणाचा विकास महत्त्वाचा असल्याचे सांगत नाराज असलेल्या कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आशिष सोनटक्के यांच्या कामाची पद्धत आणि त्यांची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची ‘गोडबोली’ भाषा यामुळे नाराज गटाचे मन वळवण्यात त्यांना यश आले आहे. “वैयक्तिक मतभेद असू शकतात, पण गावाचा आणि गणाचा विकास थांबता कामा नये,” या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सोनटक्के यांनी केलेल्या चर्चेनंतर नाराज गटाने आपली नाराजी बाजूला सारून त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण. सध्या जळकोट गणात आशिष सोनटक्के यांच्या नावाची लाट पाहायला मिळत आहे. नाराज गटाने त्यांना दिलेला आशीर्वाद हा त्यांच्या कामाची पावती असल्याचे नागरिक बोलत आहेत. सोनटक्के यांनी ज्या पद्धतीने सर्वांची नाराजी दूर करून पुन्हा एकदा सर्वांना एकत्र आणले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘आशिषभाऊ पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत,’ अशा घोषणांनी आता गणांतील वातावरण दणाणून गेले असून, त्यांच्या विजयाचा नारा अधिक तीव्र झाला आहे.