काक्रंबा गटात भ्रष्टाचाराचा ‘भस्मासूर’; सत्तेच्या माजाला चूड लावण्यासाठी ‘शिवरायांचा मावळा’ मिलिंद रोकडे विजयाच्या दिशेने!

Pranesh

निवडणुकीत सत्तेची मस्ती जिरणार की सामान्य जनतेचा ‘शिवरायांचा मावळा’ मिलिंद रोकडे विजयाचा झेंडा फडकवणार!

काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): “विकास स्वतःचा की जनतेचा?” असा संतप्त सवाल आज काक्रंबा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सामान्य जनता विचारत आहे. मागील सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली कोट्यावधींचा निधी हडप करून केवळ स्वतःची घरे भरली, असा खळबळजनक आरोप आता जनमानसातून होत आहे. याच भ्रष्टाचारी सत्तेला धूळ चाटवण्यासाठी आणि स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मिलिंद सोमनाथ रोकडे यांनी शड्डू ठोकला आहे.

विकासाच्या गप्पा, पण रस्ते मात्र खड्ड्यात! सत्ताधाऱ्यांनी कागदावर विकासाची गंगा आणली, पण प्रत्यक्षात काक्रंबा रस्ता असो की हगणदारी मुक्त गावाची घोषणा, सर्वकाही फोल ठरले आहे. “गावचा विकास करण्यापेक्षा स्वतःचा खिसा कसा गरम होईल” यातच धन्यता मानणाऱ्या या लोकप्रतिनिधींनी माणूसकीला लाजवेल असा कारभार केला आहे. जाती-पातीच्या राजकारणात विष पेरणाऱ्या या प्रवृत्तींना आता जनतेने नाकारण्याचे ठरवले आहे.

स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना जनता सोडणार नाही!छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या या मातीत, जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना ‘स्वराज्याचे गद्दार’ मानले जात आहे. ज्याप्रमाणे शिवरायांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला, त्याच धगधगत्या मशालीच्या जोरावर मिलिंद रोकडे यांनी या निवडणुकीत भ्रष्टाचाऱ्यांचे काळे कारस्थान उघडे पाडण्याचा विडा उचलला आहे.

मिलिंद रोकडे: सर्वधर्म समभावाचा बुलंद आवाज. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची शिदोरी आणि शिवरायांची निष्ठा उरात बाळगणारे मिलिंद रोकडे हे केवळ उमेदवार नसून सामान्य जनतेचे ‘शिलेदार’ म्हणून समोर येत आहेत. हिंदू, मुस्लिम, माळी, धनगर, महार, मांग अशा अठरापगड जातींना सोबत घेऊन, “जात नाही तर माणुसकी महत्त्वाची” हा मंत्र जपत ते मैदानात उतरले आहेत.

भ्रष्टाचाराचा पंचनामा होणार! “सत्ता भोगूनही ज्यांना गावातील रस्ते नीट करता आले नाहीत, त्यांना पुन्हा मते मागण्याचा अधिकार काय?” असा टोमणा मिलिंद रोकडे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

काक्रंबा गटातील या भ्रष्ट सत्तेला उखडून फेकून खऱ्या अर्थाने जनतेचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी आता ‘मनात आग पेटवून रोकडे’ उभे आहेत. या निवडणुकीत सत्तेची मस्ती जिरणार की सामान्य जनतेचा ‘शिवरायांचा मावळा’ विजयाचा झेंडा फडकवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment