धाराशिवमध्ये ‘सत्तेचा माज’ की ‘गुंडांचे राज्य’? मल्हार पाटलांच्या भूमिकेवर जनतेतून तीव्र संताप; सामान्य कार्यकर्त्याला हद्दपार करण्याचा घाट?

Pranesh

धाराशिव (अधिकार वार्ता प्रतिनिधी): आई तुळजाभवानीच्या पावन भूमीत सध्या सत्तेच्या जोरावर सामान्यांना चिरडण्याचे राजकारण सुरू असल्याची चर्चा जनसामान्यांमध्ये रंगली आहे. ज्यांचे शब्द नाही तर काम बोलते, कामाची गॅरंटी देणारे असे तुळजापूरचे भाजपा आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांच्या एका कृतीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका बाजूला पुण्यात खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि कुख्यात गुंड गजा मारणेचा ‘राईट हॅन्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमेदवाराला निवडून आणायचं आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही मार्गाने निवडणूक लढणाऱ्या कचरू मल्हार सगट या सामान्य मातंग समाजाच्या कार्यकर्त्याला ‘हद्दपार’ करण्यासाठी पत्रव्यवहार करायचा, असा गंभीर प्रकार समोर येत असल्याचे जनतेकडून सांगण्यात येत आहे.

जनतेचा सवाल: गुंडांना ‘अभय’ आणि सामान्यांना ‘तुरुंग’? धाराशिवच्या सुज्ञ जनतेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मल्हार पाटील ज्या शिवसेना (शिंदे गट) उमेदवारासाठी मैदानात उतरले आहेत, त्या उमेदवाराची पार्श्वभूमी अत्यंत वादग्रस्त आहे. पुणे शहरांतील विविध पोलीस स्टेशनमध्ये या उमेदवारावर खुनाचे प्रयत्न आणि संघटित गुन्हेगारीचे खटले असल्याचे उघड झाले आहे. “ज्या गुंडांनी सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, त्यांना सत्तेत आणण्यासाठी धडपडणे, हा आई तुळजाभवानीच्या भूमीचा अपमान आहे,” अशा भावना सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

कचरू सगट यांच्यावर अन्यायाची कुऱ्हाड? एकीकडे कुख्यात गुंडांसाठी पायघड्या घालणारे मल्हार पाटील, दुसरीकडे कचरू मल्हार सगट या चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्त्यावर पोलीस केसेस लादण्यासाठी ताकतोंचा वापर करत असल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे. कचरू सगट यांचा गुन्हा एवढाच की त्यांनी लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार निवडणूक लढवली. “एका सामान्य मातंग समाजाच्या माणसाने प्रस्थापितांना आव्हान दिले, म्हणून त्याला मानसिक त्रास देणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे आणि हद्दपारीच्या नोटिसा पाठवणे, हा सत्तेचा अहंकार नाही तर काय?” असा संतप्त सवाल आता गावपातळीवर विचारला जात आहे.

सत्तेचा माज उतरवण्याची वेळ आली आहे! मल्हार पाटील यांच्या या कथित कृतीवर जोरदार टीका होत असून, “सत्ता येते आणि जाते, पण सामान्यांचा तळतळाट कधीच सुटत नाही,” अशा शब्दांत जनतेने आपला संताप व्यक्त केला आहे. आई तुळजाभवानीने नेहमीच असुरांचा नाश केला आहे, मग तुम्ही शत्रूची पाठराखण करून एका सामान्य माणसाला त्रास का देत आहात? असा खणखणीत प्रश्न धाराशिवकर विचारत आहेत.

धाराशिवकरांचा एल्गार: कचरू सगट यांच्या पाठीशी जनता! कचरू सगट हे एकटे नाहीत, असा संदेश आता जनतेतून जात आहे. त्यांच्यावर होणारा अन्याय हा संपूर्ण वंचित समाजावर आणि लोकशाही मूल्यांवर झालेला हल्ला मानला जात आहे. एका कार्यकर्त्याला हद्दपार करण्याचा घाट घालणाऱ्यांनी हे विसरू नये की, धाराशिवची जनता अन्यायाविरुद्ध नेहमीच उभी राहिली आहे.

Leave a Comment