प्रशासनाचा नतद्रष्टपणा की जातीय दंगल घडवण्याचा कट? दिघ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बॅनरची विटंबना; ‘इ’ प्रभाग अतिक्रमण विभागाचा निर्लज्जपणा चव्हाट्यावर

Pranesh

दिघी (अधिकार वार्ता प्रतिनिधी): एकीकडे अवघा देश विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या तयारीला लागला असताना, दिघी येथील परांडे नगरमध्ये ‘ई’ प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाने सत्तेची आणि खाकीची मस्ती दाखवत महापुरुषांचा घोर अपमान केला आहे. जयंतीनिमित्त लावलेला सन्मानाचा बॅनर प्रशासनाने केवळ काढलाच नाही, तर तो अक्षरशः फेकून देऊन आंबेडकरी जनतेच्या अस्मितेवर पायदळी तुडवले आहे. प्रशासनाच्या या ‘हरामी’ आणि जातीवादी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाचा ज्वालामुखी फाटला असून, “या नीच अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा आक्रमक पवित्रा भीमसैनिकांनी घेतला आहे.

अमोल आणि आतिश घोडेकर यांच्या विनंतीला केराची टोपली; अधिकाऱ्यांची माजलेली अरेरावी! मिळालेल्या माहितीनुसार, श्री. अमोल घोडेकर आणि आतिश घोडेकर यांनी अत्यंत सामंजस्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती केली होती की, हा महापुरुषांचा बॅनर आहे आणि एप्रिल महिना हा उत्सवाचा आहे. मात्र, सत्तेची खुर्ची उबवणाऱ्या या माजलेल्या अधिकाऱ्यांनी कोणतीही तमा न बाळगता अरेरावी केली आणि बॅनर काढून फेकून दिला. कायद्याचा धाक दाखवणाऱ्या या प्रशासनाला स्वतःचे नियम माहित नाहीत का? कोणत्याही महापुरुषाचा बॅनर किंवा फोटो अशा प्रकारे अपमानित करून काढण्याचा अधिकार यांना कोणी दिला? हे कृत्य म्हणजे जाणीवपूर्वक समाजात ‘जातीय दंगल’ घडवण्याचा प्रशासकीय कट असल्याचे स्पष्ट होत आहे.

179805

माजी नगरसेवक विकास डोळस मैदानात; इतर नेत्यांचे मौन का? प्रशासनाच्या या गुंडगिरी विरोधात फक्त माजी नगरसेवक विकास डोळस यांनीच हिंमत दाखवून घटनास्थळी धाव घेतली आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, अशा गंभीर प्रसंगी समाजाचा आवाज बनण्याचे सोडून इतर तथाकथित नेते कुठे लपून बसले आहेत? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. महापुरुषांच्या सन्मानासाठी आता जनतेलाच रस्त्यावर उतरून आवाज उठवावा लागणार आहे.

दोषींवर गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबित करा; अन्यथा महाराष्ट्र पेटणार! या घटनेमुळे आंबेडकरी जनतेच्या मनाला खोलवर ठेस पोहोचली आहे. प्रशासनाने हे ‘घाण’ कृत्य करून आपल्यातील जातीवादाचे विष पेरले आहे. ज्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ही विटंबना केली आहे, त्यांच्यावर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे (FIR) दाखल करण्यात यावे आणि त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे.

प्रशासनाला जाहीर इशारा: “तुमच्या कायद्याच्या पळवाटा महापुरुषांच्या सन्मानापेक्षा मोठ्या नाहीत. जर दोषींवर कारवाई झाली नाही, तर होणाऱ्या उद्रेकाला हे निर्लज्ज प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल. महापुरुषांचा अपमान सहन करणे आता भीमसैनिकांच्या रक्तात नाही!”

Leave a Comment